Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथ खडसे आज दिल्लीत ; भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घेणार भेटीगाठी

eknath khadse
मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. खडसे आज महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजप महामंत्री बी एल संतोष यांच्यासह भाजपमधील अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे कळते.

 

विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपमधीलच काहीजणांनी रसद पुरवली, असा आरोपही त्यांनी केला होता. दोन दिवसापूर्वी भाजपची उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची विभागनिहाय बैठक पार पडली होती. यावेळी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपल्या मनातील खदखत व्यक्त केली होती. त्यानंतर पत्रकारपरिषदेत खडसे यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला होता. पक्षात माझ्यावर वारंवार अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीतील नेत्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.

Exit mobile version