Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षण हे जीवनाचा निखळ आनंद घेण्यासाठी असावं- प्रशांत देशमुख

WhatsApp Image 2019 12 29 at 6.58.23 PM

चोपडा, प्रतिनिधी | “विद्यार्थी पालक – शिक्षक,विद्यार्थी – शिक्षक यांच्यातील अंतर कमी व्हावे, त्यामुळे सर्व विकासास चालना मिळते. विद्यार्थ्यांना जे क्षेत्र आवडीचे ते निवडू द्यावे पालकांनी विद्यार्थ्यांना क्षेत्र निवडीसाठी सक्ती करू नये असे आवाहन प्रशांत देशमुख यांनी केले. ते पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ‘वाट दाखवितो क्षितिजाची’ या विषयावर विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी उदबोधन कार्यक्रमात बोलत होते.

झी २४ तास वाहिनी वरील ‘पासवर्ड आनंदाचा’ कार्यक्रम सदरकर्ते प्रशांत देशमुख पुढे म्हणाले की, जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकास प्रश्न विचारला जातो ‘तुम्ही या ठिकाणी कशा साठी आलात ? माणसाला असे कौशल्य यावे ज्यास जगात तोड नसावी. पालकांनी पारखी बनावं, आपल्या पाल्याच कौशल्य ओळखता आले पाहिजे. पालकत्व सजग असावं. मुलांना मोबाईल पेक्षा वाचनीय पुस्तकं द्या. मुलांच्या प्रगतीसाठी मन स्थिर करण्याचं शिक्षण द्या त्यासाठी ध्यान धारणा करावी. नामस्मरण केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते. रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी मुलांना सोबत घेऊन जावे. शिवचरित्र स्वतः वाचून पालकांनी जीवनात संघर्ष करणाऱ्या शिवरायांच्या महान कार्याची उदाहरणे मुलांना द्यावी असे आवाहन केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज बोरोले हे होते. तसेच या कार्यक्रमास उपाध्यक्ष, अविनाश राणे, संचालक भागवत भारंबे, गोकुळ भोळे, दिपाली बोरोले, मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, व्ही. आर. पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील, डॉ. किशोर पाठक आदी उपस्थित होते.

Exit mobile version