Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसेंना ईडीची नोटीस; १० दिवसांच्या आत मालमत्ता रिकाम्या करण्याचे आदेश

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसें यांच्यासह चौघांना ईडीने ‘पीएमएलए’ अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत नोटीस बजावली आहे.

नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात, असे आदेश संबंधित मालमत्तांच्या मालकांना देण्यात आले आहेत. तसे न झाल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या करण्याचा अधिकार संचालनालयाकडे असेल, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

देशात सर्वत्र इडीची सीडी वाजत आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आली आहे. तसेच पडसाद राज्यातदेखील उमटत असून महाविकास आघाडीचे नेते सध्या ईडीच्या निशाण्यावर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना काही दिवसांपूर्वीच ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागले होते. तर खडसेंचे जावई यांना ईडीने अटक केली होती.

एकनाथराव खडसे यांची भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी देखील केली असून नोटीस देखील बजावली होती. दरम्यान, ईडीने पुन्हा एकनाथराव खडसेंसह चौघांना नोटीस बजावली आहे. पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

त्यात मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळा, सूरत येथील फ्लॅट्स, बंगले, भूखंड, जमिनी आदी मालमत्तांचा समावेश आहे. या सर्व मालमत्तांवर ईडीने पीएमएलए ऍक्ट अंतर्गत ऑगस्ट २०२१ मध्ये टाच आणली होती. एकनाथराव खडसें यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, इन्शिया मुर्ताझा बादलावाला, आणि उकानी आदी या सर्व मालमत्तांचे मालक आहेत.

Exit mobile version