Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड करणार : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आता थेट ईडीला आव्हान दिलं आहे. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड केला जाईल, त्याचीही पत्रकार परिषद शिवसेना भवन येथेच होईल, असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे करण्यात येत असलेला भ्रष्टाचार आम्ही उघडा पाडू, केंद्रीय तपास यंत्रणांचे जे दलाल आहेत ते म्हणजे किरीट सोमय्या यांचा पालघरला प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्टवर २६० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सोबतच कोटी कोटी रूपये यांच्याकडे येतातच कुठुन? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. तुमचा भ्रष्टाचार उघड केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडे आमच्या कुंडल्या आहेत तशा आमच्याकडेही आहेत, असे पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ईडीचे अधिकारी कसे मोठ्या घोटाळ्यात सहभागी आहेत याची भांडाफोड लवकरच करणार आहे. पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी बसून मी ईडीचा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

केंद्रीय मंत्र्यावर १५० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. आता हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा. असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. माझ स्पष्ट आव्हान आहे की केंद्रीय यंत्रणा आमच्या मागे लावा तुम्ही आमचं काहीही वाकडे करू शकणार नाही, रिश्तेमे हम तुम्हारे बाप लगते है, असा टोला संजय राऊत यांना मारला आहे.

 

 

Exit mobile version