Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय राऊत यांना आज कोर्टात हजर करणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केल्यानंतर आज खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने काल सकाळी सातच्या सुमारास ताब्यात घेतले. तर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सुमारे साडेपंधरा तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, ईडीच्या अधिकार्‍यांनी केलेल्या छापेमारीत संजय राऊत यांच्या घरात साडे अकरा लाख रूपये आढळून आल्याचे वृत्त आहे. यातील दीड लाख रूपये आपले असून उर्वरित दहा लाख रूपयांच्या बंडलावर एकनाथ शिंदे अयोध्या असे लिहण्यात आले असून ते जप्त करण्यात आलेले आहे. तर आज सकाळी अकराच्या सुमारास संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांना कोठडी मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version