Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईडीचे छापे : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आता थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर छापे मारून कोट्यवधी रूपयांची संपत्ती जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडी सरकारचे नेते ईडीच्या रडारवर असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पाटणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ’पुष्पक ग्रुप’ची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ईडीच्या आजच्या छाप्यांमध्ये ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सदनिकांची एकूण किंमत ६ कोटी ४५ लाख रुपये इतके असल्याची माहिती मिळाली आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकिशोर चतुर्वेदी हा एन्ट्री ऑपरेटर असलेल्या नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून ३० कोटींचं कर्ज अनसिक्युअर्ड लोन श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शेल कंपनीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशांच्या माध्यमातून श्रीधर पाटणकर यांनी ठाण्यातील हे ११ घरांची खरेदी केली असल्याचा आरोप आहे. शेल कंपन्यांच्या मालकांनी विनातारण ३० कोटी रुपये श्रीधर पाटणकरांना दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. ईडीने २०१७ मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची २१ कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. यानंतर आता थेट श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त केल्याने ईडीने आता मातोश्रीलाच इशारा दिल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version