Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

 

jet naresh

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबई, दिल्लीस्थित निवासस्थान आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज छापेमारी केली आहे.

 

जेट एअरवेज ही कंपनी १७ एप्रिल रोजी बंद पडली असून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात कंपनीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळून आले आहे. मार्च महिन्यात गोयल एअरलाइनच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. तर दुसरीकडे जेट एअरवेज सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. दरम्यान, परकीय चलन विनिमय अधिनियमातील (FEMA)तरतुदींच्या आधारे अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ही छापेमारी करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version