Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांसाठी ईडीकडे प्रश्नावलीच तयार नाही

 

मुंबई (प्रतिनिधी) राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत. मात्र, ईडीकडे शरद पवारांसाठी प्रश्नावली तयार नसल्याचे कळते.

 

ईडीने शरद पवारांना अद्याप चौकशीला बोलावलेले नाही. शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडीचे मुंबईचे सहसंचालक शरद पवारांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. केवळ अर्धा तास ते तासाभरात पवारांना ईडीमधून सोडले जाईल. शरद पवारांना तिसऱ्या टप्यात समन्स बजावून चौकशीला बोलावू शकतात. राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील 25 हजारा कोटींच्या या व्यवहारात पैशांचा लाभ कुणाला हा तपासाचा मुख्य भाग आहे.

Exit mobile version