खा. भावना गवळी यांना इडि चौकशीची भीती का वाटते? -सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – शिवसेनेच्या खा. भावना गवळी या ईडीकडून आलेल्या चौथ्या समन्सलाही उपस्थित राहिलेल्या नाहीत. त्यांना इडि चौकशीची भीती का वाटते? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारत भावना गवळी यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांना आतापर्यंत ईडी कडून चार वेळा समन्स बजावण्यात आलेत. पण एकही चौकशीला त्या उपस्थित नसून त्यांचे वकील ईडी कार्यालयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांकडून वेळ मागून घेत आहेत. भावना गवळी यांनी चौकशीसाठी उपस्थित रहावे, इडिसमोर चौकशीसाठी हजर राहण्यात कशाची भीती वाटते? असा प्रश्न उपस्थित करत याचा हिशोब तर द्यावाच लागेल असं किरीट सोमय्या म्हणाले.

शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांनी १९९२ मध्ये ‘बालाजी पार्टीकल’ नामक कारखान्याची नोंदणीसह स्थापना करण्यात आली. या कारखान्याच्या विक्रीला    सरकारची परवानगी नसतानाही कारखाना विकल्यासह १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यासाठी शिवसेना खा. भावना गवळी यांना ईडीनं नोटीस बजावली होती. दरवेळी खा. गवळी ऐवजी त्यांचे वकील हजर राहून ईडीकडून वेळ मागून घेतात. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खा. भावना गवळी यांना जमीन विक्रीच्या व्यवहाराबाबत उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.

Protected Content