Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“विकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेच्या रथाचा ओझर येथे खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते  26 जानेवारी 2024 या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणाऱ्या रथापैकी चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रथाचा शुभारंभ करण्यात आला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून एक तरी लाभ आपणास मिळावा यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे.हा लाभातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज सकाळी दहा वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते तर लोकनियुक्त सरपंच प्रणाली पवार,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमूख बाजीराव आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीसाठी हा रथ रवाना करण्यात आला.

खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या नेतृत्वात भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच माहे जुन-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून आज ओझर ता.चाळीसगाव येथून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून ही एल ई डी माहितीपट असलेला रथ तालुक्यात फिरणार आहे. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रणाली पवार यांनी श्रीफळ वाढवून रथाचे पूजन केले. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी प्रास्ताविक तर आदर्श शिक्षक निकम सर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास माळी, ग्रामसेविका एस.वाय.चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गुजर, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिपाली पवार, ग्रामपंचायत सदस्य सोनाली गुजर, विनोद  पाटील, मुरलीधर पाटील, प्रवीण गुजर, दिनकर पाटील, श्याम पाटील, शांताराम पाटील, मा.उपसरपंच मिलिंद जाधव, पत्रकार सुभाष जाधव, महेंद्र जाधव, मनोज जाधव, रंगनाथ पाटील, मिठाराम गुजर, संजय गुजर, ज्ञानेश्वर गुजर, लालाभाऊ गुजर, मोहनदादा गुजर, बाजीराव अहिरे, भाऊसाहेब गुजर, गोपाल गुजर, किशोर गुजर तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version