Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. उन्मेश पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेश पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत रांगोळीने लिखाण केले असून अज्ञात समाजकटंकांविरुद्ध गंभीर कारवाई करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

संबंधित घटनाक्रम, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यालय, आमदार राजूमामा भोळे यांच्या निवासस्थानाबाहेर तसेच आमदार राजुमामा भोळे यांच्या स्टेडियम कॉम्प्लेक्सजवळील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री बारा वाजता अज्ञात व्यक्तींनी टाटा हॅरिअर चारचाकी वाहनातून येऊन चार महिला व चार पुरुषांनी या ठिकाणी गलिच्छ आणि शिवराळ भाषेत रांगोळीने लिखाण केले आहे. सदर लिखाणातून आमचे नेते खासदार उन्मेश पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजु मामा भोळे यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. असून अज्ञात समाजकटंकांविरुद्ध गंभीर कारवाई करून सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे केली आहे.

दिलेल्या निवेदन नमूद केले आहे की आमच्या नेत्यांच्या बाबत या अज्ञात व्यक्तींना वेगळ्या स्वरूपाचे काहीतरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर लिखाणातून आमच्या नेत्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. म्हणून सदरील लिखाण करणारे जे कोणी अज्ञात व्यक्ती असतील त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आपण झालेल्या  प्रकाराबद्दल तातडीने कारवाई करावी अन्यथा कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. अन्यथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील. असे भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी साहेब, पोलिस निरीक्षक जिल्हा पेठ पोलिस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version