केळी पिकांचे नुकसानीचे खा. रक्षा खडसेंकडून पाहणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आज खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी, तहसीलदार यांनी यावल तालुक्यातील विविध ठिकाणी नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली.

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा , मोहराळा , चुंचाळे , बोराळे, चिंचोलीसह विविध ठिकाणी व परिसरात काल३१ मे रोजी अचानक झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा फटका बसला असून, जोरदार पावसासह वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मुख्यता कापणीवर आलेल्या केळी बागांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावेळी आज  हिंगोणा शिवार व तालुक्यातील विविध गावामध्ये मान्सूनपूर्व आलेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसाग्रस्त केळी बागांना रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, तहसिलदार यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासमोर आपल्या शेतातील अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे खराब झालेले  पिके दाखवून विदारक परिस्थितीचे कथन केले व शेतकऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता, पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी  शेतकऱ्यांना खासदार रक्षाताई खडले यांनी व आपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी धीर दिला व लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी  रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या सोबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण  चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फ़ेगडे, जिल्हा चिटणीस सविता भालेराव, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सागर महाजन, माजी नगरसेवक डॉ.कुंदंन फ़ेगडे, मनोज वायकोळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष  किशोर पाटील, तहसीलदार  महेश पवार, मंडळ अधिकारी मितींद देवरे यांच्यासह विविध विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी तसेच हिंगोणा तलाठी धांडे अप्पा, शेतकरी परेश राजपूत, संतोष सावळे, शशिकांत चौधरी, फ़िरोज तडवी, मछिंद्र पाटील, किशोर पाटील यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी हिंगोणा गावातील परेश प्रविण राजपुत या अल्पवयीन मुलांचे आई व वडीलांचे काही दिवसापुर्वी उपचार सुरू असतांना मृत्यु झाले असुन आई वडीलांच्या उपचारासाठी शेततारण करून देखील उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या आई वडीलांच्या मृत्युमुळे व मासुनपुर्वी आलेल्या वादळीवारा व पावसामुळे केळी बागांचे झालेल्या नुकसानमुळे ही अनाथ झालेली परेश राजपुत वय१७ व त्याचा ९ वर्षाचा लहान भाऊ यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी सुचना महसुल प्रशासनाला खासदार यांनी दिल्या असुन आपल्या पातळीवर देखील त्यांच्या पुढील शिक्षणासाठी व दुसरी काय व कशी मदत करता येईल, यासाठी आपण सर्वतोपरीने मदत करू, असे आश्वासन खासदार रक्षाताई खडसे यांनी यावेळी दिले.

 

Protected Content