Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन ट्रकांची समोरासमोर टक्कर : एक जण जागीच ठार, एक गंभीर

earandol apghat

एरंडोल (प्रतिनिधी) मालेगाव येथे डाळिंब विकून रावेरकडे परत जाणारी आयशर मिनी ट्रक व जळगाव कडून धुळेकडे जाणारी ट्रक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने आयशर ट्रक चालक व मालक बबन रतन राठोड (वय ३२) रा.गुलाबवाडी, ता.रावेर याचा जागीच मृत्यू झाला असून डाळिंबांचा मालक अजय अशोक चौधरी (वय ३०) रा.रावेर हा गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना एरंडोलपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर दादाजी पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, अजय चौधरी यांनी डाळिंब विकण्यासाठी मालेगाव जाण्याकरिता आयशर गाडी (क्र. एम.एच.१९, सी.वाय.१२५३) भाड्याने घेतली होती. डाळिंब विकून रावेरकडे परत जात असताना एरंडोलनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगावकडून धुळ्याकडे जाणारी ट्रक (क्र.एम.एच.१८, ए.सी. ८७६२) आणि आयशर गाडी यांची समोरासमोर टक्कर झाली. त्यात वरीलप्रमाणे एक जण ठार एक जखमी झाला आहे. घटनेचे वृत्त समजताच पो.नि. अरुण हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व रहदारी मोकळी केली. त्यानंतर चालकाचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे.काँ. विकास खैरनार व मधुकर पालीवाल हे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version