Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ई-वर्षग्रंथ स्पर्धा ऑनलाईन पध्दतीत उत्साहात

चोपडा प्रतिनिधी । महात्मा गांधी शिक्षण संस्था संचलीत श्रीमती शरदचंद्रीका पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात ई-वर्षग्रंथ ही स्पर्धा ऑनलाईन या प्रकारात पार पडली.

ई-वर्षग्रंथ हे मासिक या वर्षात कोविङ-१९ या जागतिक महामारी च्या कालखंडात ऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस सम्बंधीत विभागा मार्फत आहे त्याकरीता क्यूआर कोड फ्लीप बुक ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्ष ग्रंथ हे मासिक उपलब्ध होऊ शकेल असा आशावाद संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप पाटील, उपाध्यक्ष आशाताई पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी व्यक्त करून या निर्णयाचे स्वागत करून कौतुक केलेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम, पी. वडनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार ई-वर्षग्रंथ या मासिकातील माहिती डिजिटल फार्मासिस्ट, ऑनलाईन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजंस कंप्यूटर टेक्नोलॉजी इन फार्मसी या विषयावर आधारित असुन हे  आजच्या आधुनिक शिक्षण प्रणाली नुरूप अतिशय योग्य असून ही काळाची गरज आहे. 

संपादकीय विभागाकडून प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली मुखपृष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व मुखपृष्ठ सादर केले त्यापैकी तृतीय वर्ष विद्यार्थी अल्पेश पाटील, द्वितीय वर्ष विद्यार्थिनी स्वाती महाजन, तेजल अग्रवाल, कोमल पाटील व भाग्यश्री चौधरी या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मुखपृष्ठ उल्लेखनीय होते. त्यातील द्वितीय वर्ष विद्यार्थिनी तेजल अग्रवाल या विद्यार्थीनीने तयार केलेले मुखपृष्ठ वर्षग्रंथ मासिकासाठी निवड समितीकडून निवडण्यात आले आहे. तेजल अग्रवाल या विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप पाटील, उपाध्यक्ष आशाताई पाटील व सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे व महाविद्यालयाचे प्रबंधक पी. बी. मोरे, आर. आर. देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. तसेच मुख्य संपादक सुवर्णलता एस महाजन, उपसंपादक क्रांती पाटील, प्रेरणा जाधव व प्रियंका पाटील व इतर विभाग प्रमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  यांनीसुद्धा कुमारी तेजल अग्रवाल व इतर सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Exit mobile version