Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्ञानेश्‍वर मुळे यांची लाईव्ह ट्रेंडस् न्यूज कार्यालयास भेट

जळगाव प्रतिनिधी । माजी परराष्ट्र सचिव, ख्यातप्राप्त साहित्यीक तसेच पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ख्यात असणारे ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली.

दीपस्तंभ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या यशोत्सव कार्यक्रमानिमित्त आज ज्ञानेश्‍वर मुळे जळगाव येथे आले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या कार्यालयास भेट दिली. त्यांचे स्वागत लाईव्ह मीडियाचे संचालक विनय पारख यांनी केले. नंतर त्यांनी संपादकीय विभागातील सहकार्‍यांशी संवाद साधला. यात त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

Exit mobile version