Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुध्दीबळ स्पर्धेत चाळीसगावच्या अवंतीसह जळगावच्या दुर्वेशने मारली बाजी

जळगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १४ वर्षा आतील गटात मुलांमध्ये जळगाव कीडस गुरुकुल स्कूल चा दुर्वेश कोळी तर मुलींमध्ये चाळीसगाव पोदार शाळेची अवंती महाजन यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले.

विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देऊन गौरविण्यात आले. आंतर शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते पटलावर चाल करून करण्यात आले. या स्पर्धेत १५ तालुक्यातील मुलांमध्ये ६६ तर मुलींमध्ये ६२ खेळाडूंचा सहभाग होता. सदर स्पर्धा स्विजलीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आली.

या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे तथा जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे रवींद्र धर्माधिकारी, स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीण ठाकरे, आरबिटर नत्थु सोमवंशी व क्रीडा समन्वयक मीनल थोरात आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेतील विजेते व विभागीय पातळीवर निवड झालेले खेळाडू.

मुली

१)अवंती महाजन, पोदार स्कूल चाळीसगाव
२)ऋतुजा बालपांडे, गो से हायस्कूल पाचोरा
३) सिद्धी लाड, चावरा स्कूल, चोपडा.
४) भाग्यश्री चौधरी, के नारखेडे भुसावळ.
५)श्रावणी अलाहीत गुरुकुल, स्कूल, पाचोरा

मुले

१)दुर्वेश कोळी, किड्स गुरुकुल जळगाव.
२)आर्य कुमार शेवाळकर, गो से स्कूल, पाचोरा
३)समर्थ पाटील पोदार, चाळीसगाव.
४) सोहम चौधरी सेंट अलाईसेस स्कूल, भुसावळ
५) मंधार पाटील, पंकज स्कूल चोपडा.

स्पर्धेतील पंच

मुख्य पंच प्रवीण ठाकरे, सहायक पंच नथू सोमवंशी, अभिषेक जाधव व सोमदत्त तिवारी.

Exit mobile version