Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फोन टॅपिंगसाठी राऊत व खडसेंसाठी वापरलीत ‘ही’ नावे !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फोन टॅपींग प्रकरणातील चौकशीतून एक मोठा गौप्यस्फोट झाला असून खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासाठी टोपण नावे वापरून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्यातील काही राजकारण्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण आता गंभीर वळणावर गेल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात आधीच कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून यात तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचाही समावेश आहे.

या प्रकरणात आतापर्यंत संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांनी आपले जबाब नोंदविले असून सोबत सहा साक्षीदारांचेही जबाब घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून आता नवीन धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणात सहभागी असणार्‍या इतर पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत आणि खडसे यांच्या फोन टॅपींगचे निर्देश देतांना त्यांच्याच नावाचे साधर्म्य असणारी पण बनावट नावे वापरण्यात आल्याची माहिती या पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे. यानुसार संजय राऊत यांच्यासह एस. रहाटे तर एकनाथराव खडसे यांच्यासाठी खडसणे हे नाव वापरण्यात आलेले आहे.

अर्थात, टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांचे फोन टॅपींग करण्यात आल्याचे ताज्या तपासातून दिसून आले आहे.

Exit mobile version