Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील जोगलखेडा परिसरात वाघुर नदीपात्रातुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करतांना महसूल पथकाने कारवाई करत वाळूने भरलेले डंपर पकडले. महसूल पथकाला पाहून वाहन चालक हा मजुरांसह पळ काढल्याची घटना  घडली आहे.  पोलिसांनी साकेगाव ग्रामस्थांच्या मदतीने वाळूने भरलेले डंपर ताब्यात घेऊन भुसावळ तहसील कार्यलय आवारात जमा केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाळू माफियांविरुद्ध कंबर कसल्याने सध्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. रविवारी एका डंपरमधून अवैधरित्या वाळूची उत्खनन व वाहतूक केली जात होती. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखालील संयुक्त पथक जोगलखेडा भागात वाघुर नदीपात्रातुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक तपासणीसाठी गस्तीवर होते. त्यावेळी साकेगाव जोगलखेडा रस्त्यावर मनोज परदेशी (रा. साकेगाव) यांच्या मालकीचे वाहन (एमएच १९, जे ३९५१) साकेगावच्या दिशेने येत होते. वाहन चालकाने पथक दिसताच वाहन रस्त्यावर थांबून मजुरासह पळून गेला.

त्यानंतर तहसिलदारांच्या माहितीवरून घटनास्थळी तत्काळ पोलीस मदत पाठवून वाहन तपासले असता त्यात वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार वाहन व वाहनतील गौण खनीजाचा पंचनामा केला असता, वाहनात अंदाजे २ ब्रास वाळू होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहन ताब्यात घेऊन साकेगाव ग्रामस्थांच्या मदतीने ते तहसील कार्यलय आवारात जमा केले आहे.

Exit mobile version