Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डंपरची रिक्षाला धडक : वृद्ध महिला जागीच ठार तर दोन जखमी

पाचोरा प्रतिनिधी । उभ्या प्रवाशी रिक्षास डंपरने धडक दिल्याने रिक्षामधील बसलेल्या एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. घटनेप्रकरणी नगरदेवळा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

नगरदेवळा-आखतवाडे दरम्यान दि. २१ रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पॅजो रिक्षा (क्रं. एमएच. ४१ सी. ४१०५) ही नगरदेवळ्याहून प्रवासी घेऊन आखतवाडे जात असतांना तिच्यात काही बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी होती. यावेळी समोरून बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या डंम्पर (क्रं.  एमएच. १९ झेड २१०९) ने जोरदार धडक दिल्याने रिक्षाची दिशा बदलत यात बसलेल्या कपडे विक्रेती महिला शरिफा बी. शेख जाबाज (वय – ७२) रा. कासोदा ता. एरंडोल ही जागीच ठार झाली. तर सुनिता रमेश परदेशी (वय – ४४), सोनाबाई प्रकाश गढरी (वय – ४७) रा. आखतवाडे  ता. पाचोरा हे जखमी झाल्याने त्यांना नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोचार करुन पुढील उपचारार्थ पाचोरा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत वृद्ध महिलेचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले. याबाबत पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनोज पाटील,अमोल पाटील करित आहेत.

Exit mobile version