Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुभाजकावर धडकलेले अवैध गौण खनिजची वाहतुक करणारे डंपर जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर दुभाजकावर धडकल्यानंतर महसूल खात्याचे पथकाने जप्त केले आहे.

 

या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या आदेशान्वये व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाची गस्तीची कारवाई सुरू होती. दरम्यान, दिनांक १४ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुसाट वेगाने वाळुची यावल किनगाव मार्गावर विनापरवाना अवैद्यरित्या गौण खनिजची वाहतुक करणारे एमएच १९ सि वाय ३४२६या क्रमांकाचे डंपर अचानक नायरा पॅट्रोल पंपा समोरील नगर परिषदच्या दुभाजावर धडकले.

 

या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. याचे वृत्त कळताच गस्तीवर असलेल्या महसुलच्या पथकाने कारवाई करीत संबधीत डंपर पकडून जप्त केते आहे. डंपरवर करण्यात आलेल्या कारवाईच्या महसुल पथकात फैजपुरचे मंडळ अधिकारी एम एच तडवी, भालोदचे मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांच्यासह भालोदचे तलाठी भारत सोनवणे, हिंगोणा तलाठी निलेश धांडे , डोंगर कठोराचे तलाठी वसीम तडवी , यावल तलाठी ईश्वर कोळी, फैजपुर तेजस पाटील , दहिगाव तलाठी विलास नागरे, अंजाळे शरद सुर्यवंशी, अकलुद,न्हावी प्र.यावलचे तलाठी अजय महाजन यांच्यासह महसुलच्या वाहनाचे चालक अरविंद बोरसे यांनी कारवाई सहभाग घेतला.

Exit mobile version