Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘वंचित’मुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे ३२ उमेदवार पराभूत

1vanchit 0

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. या ३२ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.

 

विधानसभा निवडणुकीत चांगल यश मिळवलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसोबत वंचितसोबत आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे. राज्यातील जवळपास ३२ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे. वंचितने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असती तर राज्यात आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे आता निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version