अरुंद रस्त्यामुळे बस फसली खड्ड्यात; सुदैवाने टळली जिवितहानी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा आगाराची बसही पिंपळगाव (हरेश्वर) गावानजीक अरुंद रस्त्यामुळे खड्ड्यात फसल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी अरुंद रस्त्यामुळे भविष्यात अॅक्सिडन्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

पाचोरा आगाराची प्रवाशी बस (क्रं. एम. एच. १४ बी. टी. २०७९) आज सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाचोऱ्याहून पिंपळगाव हरेश्वरच्या दिशेने निघाली.

पिंपळगाव हरेश्वर स्थानकात पोहचण्याच्या आधी काही अंतरावर मनुदेवी मातेच्या मंदिराजवळ अरुंद रस्ता आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूला खड्डे आहेत. बस चालकास त्याचा अंदाज न आल्याने सदरची बस ही रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात जावून फसली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील अनर्थ मात्र निश्चित टळला आहे. हा अरुंद रस्ता असल्याने याठिकाणी अॅक्सिडन्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे. अशी मागणी बसमधील प्रवाशी यांनी केली असून स्थानिक नागरिकांकडूनदेखील हि मागणी जोर धरु लागली आहे.

Protected Content