Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्मशानभूमीचा स्लँब कोसळल्यामुळे अमळनेरात संशयकल्लोळ

 

अमळनेर : ईश्वर महाजन

येथील खडेश्वर मंदिर समोरील स्मशानभूमीचा स्लॅब अचानक कोसळल्याने शहरात मोठा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. हजारो रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या बांधकामाचा स्लॅब तीनच दिवसात कोसळतो, यामागचे नेमके कारण काय? बांधकाम निकृष्ट होते की, काही राजकारण झाले? या विषयावर सध्या अमळनेरमध्ये चर्चेला ऊत आले आहे.

या संदर्भात अधिक असे की, अमळनेर नगरपालिका पालिकेच्या भाजी मार्केट व स्मशान भूमी ही दोन्ही कामे बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याने स्मशानभूमीचे काम माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन यांनी घेतलेले होते. खडेश्वर महादेव मंदिर समोरील स्मशानभूमीत च बांधकाम सुरू असतांना स्लॅब टाकायला फक्त तीन दिवस झालेले होते. सदर स्लॅबच्या लोखंडी दांडिया लावलेल्या होत्या. त्या दांडिया कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्या व अचानक स्लॅब कोसळला, असे आमदार शिरीषदादा मित्र परिवारातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे हजारो रुपये खर्च करून विकास कामे केली जातात. परंतु तीन दिवसात स्लॅब कोसळणे हजार रुपयाचा सिमेंट, विटा, मजुरी वाया जाणे याला जबाबदार कोण? विकास कामे करत असताना सिमेट व खडी निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे स्लॅब कोसळला तर नाही ना? असे प्रश्न अमळनेर शहरवासीयांच्या मनात निर्माण झालेले आहेत. म्हणतात ना” कुंपणानेच शेत खाल्ले “असा प्रत्यय सध्या दिसत आहे.प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याने खडेश्वर स्मशानभूमीचा स्लॅब कोसळला, असे विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सदर स्मशान भूमीतील प्रेतांनी गोंधळ घातल्याने स्मशान भूमीचे बांधकाम आज कोसळून जमीनदोस्त झालेले आहे. स्मशान भूमीचे भुते B&C चे उप-अभियंता सूर्यवंशी आणि वारुळेसाहेब यांच्या मागे लागल्याने त्यांनी अखेर राजभवनच्या मंदिरात प्रवेश करून मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या पुढ्यात “गुढी” मांडली आहे. असे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सदरचे भटकते प्रेतात्मा कुणा-कुणाचे बळी घेतात ? याकडे अमळनेर शहरवाशियांचे लक्ष लागले आहे.

विकास कामे करीत असताना राजकारण करता कामा नये, जे काम ज्या विभागाचे आहे त्या विभागाला प्रामाणिकपणे करू दिले तर निश्चितच शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही , पण हे सर्वज्ञात असताना एखादं काम काढून दुसऱ्याकडे घेऊन जाणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न अंमळनेर शहरवासीयांच्या मनात निर्माण झालेला आहे. दरम्यान, स्लॅब कोसळणे ही एक संशयास्पद गोष्ट असून याबाबत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केली आहे.

खंडेश्वर स्मशानभूमीचे बांधकाम सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा स्लँब टाकलेला नव्हता .फक्त परतीचा भाग स्लॅप म्हणून भरलेला होता परंतु परतीच्या खाली लोखंडी दांडा लावलेल्या होत्या. काही अज्ञात समाजकंटकांनी चोरून नेल्या त्यामुळे कोणतेही प्रकारच्या सपोर्ट नसल्यामुळे वरील परतीचा भाग खाली कोसळला. त्यामुळे दांडिया चोरी करणाऱ्या व्यक्तींची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये मी दिलेली आहे. त्याचा लवकरच तपास लागेल समाज काम करत असताना काही लोक राजकारण करतात त्याचे हे एक उदाहरण आहे. बऱ्याच लोकांनी अफवा केलेली आहे की, स्लॅब कोसळला,स्लँब टाकलेला नाही तर कोसळणार कुठुन? अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन यांनी दिलीय.

Exit mobile version