Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून दोन भावांना फायटरने बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी गावात जुन्या भांडणाऱ्या कारणावरून दोन भावांना फायटर व दुचाकीच्या ब्रेकच्या वायरने बेमद मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे भारत भागवत ठाकरे (वय-२८) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती व मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारत ठाकरे हा त्याचा भाऊ किशोर ठाकरे यांच्या सोबत घरी बसलेले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रविण बुधा सोनवणे, संदीप बुधा सोनवणे, अजय बुधा सोनवणे, बुधा भुरा सोनवणे आणि उषाबाई बुधा सोनवणे सर्व रा. मुसळी ता.धरणगाव यांनी फायटर आणि दुचाकीच्या ब्रेकीची वायरने दोन्ही भावांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार प्रविण बुधा सोनवणे, संदीप बुधा सोनवणे, अजय बुधा सोनवणे, बुधा भुरा सोनवणे आणि उषाबाई बुधा सोनवणे सर्व रा. मुसळी ता.धरणगाव यांच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोहेकॉ विजय चौधरी करीत आहे.

Exit mobile version