Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांची छेड काढणारा निघाला दुचाकीचोर

duchaki chor

जळगाव प्रतिनिधी । महिलांची छेड केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी हा दुचाकी चोर असल्याचे समोर आले आहे. अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्याचे यश एमआयडीसी पोलिसांना आले आहे. यापूर्वी तब्बल याच आरोपीच्या विरोधात वेगवेगळ्या घटनेप्रकरणी आठ गुन्हे दाखल आहेत.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार निलेश दिलीप पाटील रा. रायपूर ता.जि. जळगाव याने 14 जून 2019 रोजी एका महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली होता. या गुन्ह्यात त्याची अधिक चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यातच स.फौ. रामकृष्‍ण पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, संशयित आरोपी निलेश पाटील याने बऱ्याच मोटरसायकली चोरल्या आहेत. याबाबत संशयिताची अधिक चौकशी केली असता त्याने दोन लाख रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली काढून दिल्या. त्यात बजाज दुचाकी क्रमांक (एमएच 19 एजी 4338), पल्सर क्रमांक (एमएच 19 एजी 5319), फॅशन प्रो (एमएच 19 सीएस 6412) आणि बजाज पल्सर क्रमांक (एमएच 19 एएस 0588) या चार दुचाकी यांचा समावेश आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रामकृष्‍ण पाटील, संभाजी पाटील, आनंद पाटील, अतुल वंजारी, पोलीस नाईक विजय पाटील, मनोज सुरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील, हेमंत कळस्कर, किशोर पाटील, असीम तडवी यांनी कारवाई करत चार दुचाकी हस्तगत केल्या अजून आरोपीकडून काही दुचाकी मिळतात का याची चौकशी सुरू आहे ?

आठ गुन्हे याप्रमाणे,
एमआयडीसी पो.स्टे. भाग 5 गुरनं 242/2015, एमआयडीसी पो.स्टे. भाग 5, गुरनं 110/2017, एमआयडीसी पो.स्टे. भाग 5, गुरनं 293/2018, एमआयडीसी पो.स्टे. भाग 5, गुरनं 464/2019, एमआयडीसी पो.स्टे. पनाका नं 1229/2015, एमआयडीसी पो.स्टे. पनाका नं 42/2019, एमआयडीसी पो.स्टे. पनाका नं 66/2019, एमआयडीसी पो.स्टे. हद्दपार प्रस्ताव क्रमांक 03/2019 असे गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version