Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूच्या नशेत नारळ विक्रेत्याला दोघांकडून मारहाण; एमआयडीसीत गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्याला हटकल्याचा राग आल्याने दोघांनी नारळ विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील रामेश्वर कॉलनी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, चरणदास गुळवे रा. रामेश्वर कॉलनी यांच्या घरात नारळ विक्रेता ऋषीनाथ अरूण धोबी (वय-३७) रा. अदित्य हॉटेल, रामेश्वर कॉलनी हा तरूणा भाड्याने राहतो. १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारी राहणारा अरूण संजय कोळी हा दारू पिऊन घरी आला. त्यावेळी अरूण कोळी हा चरणदास गुळवे यांना शिवीगाळ करू लागला. घरमालकाला शिवीगाळ का करतो ? असा जाब ऋषीनाथ कोळी याने विचारला असतान अरूण कोळीने त्याची पत्न सुनिता संजय कोळी रा. रामेश्वर कॉलनी यांनी ऋषीनाथचा हात पकडून छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली व जमीनीवर ढकलून दिले. ऋषीनाथ धोबी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदिप पाटील करीत आहे. 

 

Exit mobile version