Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूच्या नशेत पत्नीवर चाकूहल्ला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गोजोरा गावात दारूच्या नशेत पत्नीवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी पतीवर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अजय प्रकाश सपकाळे (वय-३५) रा. आसोदा ता.जि.जळगाव हा आपल्या पत्नी सुरेखा सपकाळे सह वास्तव्याला आहे. गेल्या काहि दिवसांपासून पत्नी सुरेखा ह्या भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे माहेरी आलेल्या होत्या. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अजय सपकाळे हा दारू पिऊन गोजोरा येथे आलेला होता. त्यावेळी त्याने पत्नी सुरेखा आणि त्यांची आई छायाबाई सोनवणे हे दोघे ओट्यावर बसलेले असतांना पत्नी सुरेखा यांना शिवीगाळ करू लागला. त्यानंतर हातात चाकू घेवून सुरेखावर हल्ला चढविला. यात सुरेखा या महिला गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता छायाबाई सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय सपकाळे यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल पवार करीत आहे.

Exit mobile version