द्रौपदी मोर्मू यांना भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली :-द्रौपदी मोर्मू यांना भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिशातील रहिवासी असून त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी असतील.

भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या बैठकीनंतर द्रोपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून नाव घोषीत करण्यात आलं. द्रोपदी मुर्मू ह्या सध्या झारखंडच्या राज्यपाल असून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

एनडीएच्या बैठकीत एकूण 20 नावावर चर्चा झाली. त्यातूनच मग मुर्मू यांच्या नावावर एकमत झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं. यावेळेसचा राष्ट्रपती उमेदवार हा देशाच्या पूर्व भागातला असावा, तसच तो आदिवासी असावा एवढच नाही तर ती महिलाही असावी अशी चर्चा झाली आणि ह्या सर्व बाबी द्रोपदी मुर्मू पूर्ण करतात. त्यामुळेच त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

Protected Content