Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खड्डामुळे चालकाचा सुटला ताबा : सुकी नदीजवळील घटना

सावदा ता. रावेर प्रतिनिधी ।  सावदा ता. रावेर प्रतिनिधी । लोहारा येथे शेतातून पुरुष व महिला ट्रॅक्टरमध्ये घरी येत असताना सुकी नदी पुलावर मोठ्या खड्ड्यांमुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टर थेट खाली कोसळले.

यामध्ये किमान २० ते २५ महिला शेतमजूर होत्या. त्यामध्ये तीन महिला यांना गंभीर दुखापत झालेली आहे असून त्यांना फैजपूर येथील खाचणे एक्सिडेंट हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केलेले आहे. काही महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना कुंभारखेडा येथील खासगी दवाखान्यांमध्ये औषध उपचार तसेच प्राथमिक उपचार सुरू केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पूलाची ही अवस्था खराब  झाली आहे. त्या पुलाविषयी लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी असंवेदनशील  दिसून येत असल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्ती विषयी तक्रारी करूनही सदर अधिकारी यांनी दुर्लक्ष  केल्यामुळेच सदर अपघाताचा प्रकार घडला असल्याची चर्चा परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. 

या लोहारा जवळील पुल व रस्ता याविषयी लोहारा येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही दिला होता. या पुलावरील अपघाताची शक्यता सर्व पत्रकारांनी आपापल्या दैनिकांमधून याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. तसेच अपघाताचीही शक्यता वर्तवली होती, त्या प्रकारे या अपघातास जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये बोलला जात आहे. तरीही लोकप्रतिनिधी कानाडोळा करत आहेत सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही तरी हा पूल व रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ व जखमीच्या नातेवाईकांनी केली व लोकप्रतिनिधीं विषयी तीव्र संताप व्यक्त केला.

सदर अपघाताची माहिती मिळताच सावदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांनी कर्तव्य दक्ष तत्परतेने घटनास्थळी पोलिस टीम रवाना केली, यात पीएसआय राजेंद्र पवार, पो.काॅ. मेहरबान तडवी, युसूफ तडवी, देवेंद्र पाटील, यांनी ताबडतोब जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने पुढिल उपचारांसाठी रवाना केले. यांमध्ये महिला शेतमजूर विंमल महाजन, सुनिता महाजन, शरीफा तडवी, इरशाद तडवी यांना जबर दुखापत झाली असून हरकोबाई पाटील, रिना बेलदार, जयश्री पाटील, मंगला पाटील, सिमा पाटील, शारदा बेलदार, छाया पाटील, शुभांगी बेलदार ,सागरबाई भालेराव, सुनंदा बेलदार, लताबाई बेलदार, सर्व कुंभारखेडा येथील शेतमजूर महिला आहेत.

 

Exit mobile version