Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी दणदणीत मताधिक्याने निवड

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून यात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार्‍या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.

भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे द्रौपदी मुर्मू तर विरोधकांतर्फे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्यात लढत झाली. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून संसद भवनात मतगणना सुरु झाली. यातील तीन फेर्‍यांमध्ये मतमोजणी झाली. यात मुर्मू यांना ७ लाख ७७ हजार ७७७ इतकी मते मिळालीत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा २ लाख ६१ हजार ६ इतकी मते मिळाली आहेत. यामुळे द्रौपदी मुर्मू यांचा विक्रमी मतांनी विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

द्रौपदी मुर्मू या दुसर्‍या महिला राष्ट्रपती असून प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या. आणि आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी त्या राष्ट्रपतीपदी निवडून आल्या होतया. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे. यानंतर मुर्मू यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, आज सायंकाळी मुर्मू यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Exit mobile version