Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज


जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे मंगळवारी उमेदवारी दाखल करणार आहेत.

जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीतर्फे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी जाहीर केली. जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडल्यानंतर उमेदवार म्हणुन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. आज मुंबई येथे पक्षाचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातुन डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परीषदेत प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी रावेर मतदारसंघातुन डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारी अर्जासाठी मंगळवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी १० वा. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात महाआघाडीचा संयुक्त मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतर डॉ. उल्हास पाटील हे अर्ज भरणार आहेत.

Exit mobile version