Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पायरेक्सीया २०२४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचा आज शुभारंभ झाला. नेत्ररोग तज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केलेल्या गोलंदाजीवर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी चेंडू टोलवित स्पर्धेला सुरूवात करून दिली. तसेच डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी देखिल जोरदार फलंदाजी करीत स्पर्धेच्या शुभारंभात रंगत आणली.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील ३२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा शुभारंभप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन केले. तसेच या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नेत्ररोग तज्ञ तथा केशव स्मृती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. धर्मेंद्र पाटील हे उपस्थित होते.

व्यासपीठावर महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि चषकाचे अनावरण करून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. पहिला सामना लातूर विरूध्द बीएचएमएस महाविद्यालय जळगाव या संघांमध्ये खेळला गेला.

Exit mobile version