Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये मानवी अवयवांचे प्रदर्शन

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अ‍ॅनाटॉमी विभागातर्फे आयोजित मानवी शरीरातील विविध अवयव आणि त्यांची कार्ये याविषयक माहितीपर प्रदर्शनीचे गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी सीबीएसई स्कूल, डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश स्कूल भुसावळ आणि सावदामधील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना मोठे कुतुहल असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी मानवी शरीरातील विविध अवयवांची माहिती जाणून घेतली.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित मोरया -२०२३ अंतर्गत अ‍ॅनाटॉमी विभागातर्फे एक दिवसीय मानवी अवयवांचे प्रदर्शन या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी अ‍ॅनाटॉमी विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी वाघ-घुले, डॉ. जमीर खान, डॉ. पूनम, डॉ. रघुराज यादव हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी गोदावरी स्कुल जळगाव, भुसावळ आणि सावदा सीबीएसई स्कूलच्या इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना प्रदर्शनाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असून त्याची माहिती जाणून घेण्याचे आवाहन केले. या प्रदर्शनीला डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांनी भेट देऊन पाहणी केली.

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली मानवी अवयवांची रचना

अ‍ॅनाटॉमी विभागातर्फे आयोजित मानवी अवयवांच्या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना शरीरातील विविध अवयव दाखविण्यात आले. तसेच हे अवयव शरीरात काय कार्य करतात याची माहिती देखिल वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखिल आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

यांनी केले आयोजन

या प्रदर्शनीच्या आयोजनासाठी डॉ. प्रत्यंशा कुराडे, डॉ. स्वराली जामकर, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. श्रृती बियाणी, डॉ. प्राजक्ता जगताप, डॉ. अनुप जाधव, डॉ. सुमित राठोड, डॉ. मयुर जाधव, डॉ. संकेत गायकवाड यांनी सहकार्य केले.

Exit mobile version