Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालया अत्यल्प दरात दर्जेदार रेडिओलॉजी सुविधा उपलब्ध

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सीटी स्कॅन किंवा एमआरआयचे नाव ऐकताच रुग्णांना टेंशन येते. या तपासण्या खर्चिक स्वरुपाच्या असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. त्याकरीता रुग्णाच्या हितास्तव गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयाद्वारे अत्यल्प दरात दर्जेदार रेडिओलॉजी सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

 

ही सेवा २४ तास सुरु असते. शरिरातील सुक्ष्म बदलांच्या हालचाली टिपण्यासाठी, त्यातील अडथळे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत लागते, त्याकरीता डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात १.५ टेस्ला ही एमआरआय मशिन तसेच सीटी स्कॅन मशिन देखील आहे. याद्वारे दर दिवसाला रुग्णांच्या तपासण्या सुरु असतात. खाजगी रेडिओलॉजी सेंटरमध्ये कुठलाही सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्यासाठी पाच हजाराहून अधिक खर्च येतो. सर्वसामान्यांना महिन्यांचे बजेट कोलमडते परिणामी असे होऊ नये यासाठी रुग्ण तात्पुरत्या पेनक्युलर घेऊन तपासण्या करणे टाळतात.

परंतु पेनक्युलर गोळी ही फक्‍त काही तास काम करते, त्यानंतरही आजार वाढत राहतो, यासाठी वेळीच रेडिओलॉजी तपासण्या करुन घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अत्यल्प दरात एक्स रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. केवळ तपासण्याच नव्हे तर स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्‍ला देखील येथे मोफत उपलब्ध आहे. रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी एमआरआयचे दिपक पाटील यांच्याशी ९३०९९०५७२७ किंवा सीटी स्कॅनचे निळकंठ खाचणे ९८९००१३८७२ यांच्याशी संपर्क साधावा.

 

तात्काळ तपासण्या, उपचाराची दिशा निश्चित

अनेकदा रस्ते अपघात वा कुठल्याही अपघातात जखमी झालेल्या तसेच अन्य कुठल्याही व्याधींनी प्रकुती खालावलेल्या रुग्णाच्या अत्यावश्यक रेडिओलॉजी तपासण्या मध्यरात्री देखील येथे तातडीने होतात. रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांद्वारे खात्रीशीर निदानही येथे होते. यामुळे रुग्णांच्या ट्रिटमेंटची अचूक दिशा ठरविण्यात तज्ञांना देखील सोयीचे होते.

Exit mobile version