Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूल, सावदाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई. स्कूल सावदा या शाळेत २७ व २८ डिसेंबर २०२३ असे दोन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर त्यांना शिरटोपी घालून बंगाली गीतावर नृत्य करण्यार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांना आदराने व्यासपीठावरपर्यंत पोहोचविले. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी शाळेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हाँस्पिटलचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, एम.आय.डी.सी.सावदा येथील चेअरमन मनोज पाटील, लोकमत समुहाचे गौरव रस्तोगी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. दि२८ गुरुवार या दिवशी स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर तसेच एपीआय सावदा जालिंदर पडे सर तसेच जिल्हा नियोजन सदस्य समिती जळगाव सौ . रेखाताई वानखेडे यादेखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या होत्या.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बंगाली नृत्य सादर केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या प्राचार्या सौ . भारती महाजन मॅडम यांच्या हस्ते प्रमुख प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्याा प्रकारच्या चित्रपटांच्या गीतावर तसेच संस्कृतीक गीतांवर नृत्य सादर केले . ही शाळा प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करीत असते आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका अर्चना इंगळे मॅडम तसेच विद्यार्थिनी टीना, आर्या यांनी केले.कार्यक्रमामध्ये पुर्व प्राथमिक वर्गापासून ते इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Exit mobile version