संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी डॉ.उद्धव पाटील

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी डॉ. उद्धव पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.

राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल अडिच वर्ष संजय गांधी निराधार समिती स्थापन झालेली नव्हती. त्यामुळे निराधार, दिव्यांग व अबाल वृद्धांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. गत अडीच वर्षात तहसिल कार्यालयात चार तहसीलदार बदलल्यानंतर आता मुक्ताईनगर नगरच्या तहसिलदार यांचेकडे पदभार आहे. त्यामुळे संगायो समितीच्या बैठका वेळोवेळी होत नसल्याने प्रकरणे मंजुरीसाठी निकाली निघत नव्हती. आमदार चंद्रकांत पाटिल यांनी समितीच्या सदस्यांची नावे पाठवल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांच्या शिफारशीवरून दि.23 रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने समिती गठीत करण्यात आली आहे. आमदार चंद्रकांत पाटिल यांनी पक्षीय भेदभाव न करता योग्य सदस्यांच्या निवडीच्या याद्या पाठवल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांचे आमदार चंद्रकांत पाटिल यांचेसहित शिवसैनिकांनी अभिनंदन केले.

संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष तसेच माजी जि.प.सदस्य डॉ. उद्धव पाटिल, वि.जा.भ.ज. प्रवर्गातून शिवसेना नगराध्यक्ष आनंदा पाटील, मागासवर्गीय प्रवर्गातून शिवसेनेचे तालुका संघटक शांताराम कोळी, सर्वसाधारण प्रवर्गातील काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. सुधीर पाटील, महिला प्रवर्गातून भानखेडा ऊप सरपंच सरला सचिन पाटील, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राष्ट्रवादीचे माजी सरपंच सचिन पाटिल, अपंग प्रवर्गातील व्यक्ती धनराज गायकवाड, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मधुकर सोनोने, सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील, ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गोळेगावचे सरपंच माधवराव देशमुख, सदस्य सचिव तहसीलदार तर म्हणुन सदस्य गटविकास अधिकारी यांची निवड करण्यात आली.

Protected Content