Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.तडवी आत्महत्या प्रकरण : तक्रारीची दखल न घेणाऱ्या वरिष्ठांना सहआरोपी करा : हायकोर्ट

dr.payal tadavi

 

मुंबई (वृत्तसंस्था) डॉ. पायल तडवी सोबत रॅगिंगचा प्रकार बऱ्याच काळापासून सुरु होता. त्यामुळे सरकारी पक्षाने खरंतर त्यांनाही सहआरोपी बनवायला हवं होते, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने नायरच्या विभाग प्रमुख महिला डॉ. यी चिंग लिंग यांच्या निष्काळजीपणाबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश तपासयंत्रणेला दिले आहेत.

 

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी न्यायमूर्ती साधना जाधव यांनी ‘शारिरीक जखमा भरता येतात, मात्र मानसिक जखमा या सहजासहजी भरत नाहीत, आणि त्या भरल्या नाहीत की अशा (आत्महत्येच्या) घटना घडतात. त्यामुळे मानसिक छळ हा जास्त भयानक असतो’. या शब्दांत ‘हा काही खुनाचा किंवा अपघाती मृत्यूचा खटला नाही, जे घडले त्याचे आम्हालाही वाईट वाटतेय’ असा दावा करत जामीनासाठी हायकोर्टात आलेल्या याचिकाकर्त्यांनाही न्यायालयाने खडे बोल सुनावले. तसेच उद्या जामीन जरी मिळाला तरी हा खटला संपत नाही तोवर या तीनही महिला डॉक्टरांचे परवाने रद्द व्हायला हवेत, अशी भावनाही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी व्यक्त केली.

Exit mobile version