Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.सुयश सुराणा एम.एस. परिक्षेत उत्तीर्ण !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील डॉ. सुयश दिलीपकुमार सुराणा यांनी एम.एस. या परिक्षेत उत्तीर्ण होऊन शहराच्या मानपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

बोदवड शहरातील सुप्रसिद्ध सुराणा कलेक्शन चे मालक  दिलीप कुमार सुरणा, प्रा.सौ हेमलता सुराणा यांचे सुपुत्र डॉ.सुयश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भुसावळ बियाणी मिलटरी स्कूल मधे मध्ये झाले. त्यांनीइयत्ता १० मधे ९९% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, उच्च माध्यमिक शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. यानंतर त्यांनी मुंबईच्या एमजीएम कॉलेजातून वैद्यकीय शिक्षण म्हणजेच एम.बी.बी.एस. पूर्ण केले. तर नाशिक येथील वसंतराव पवार कॉलेजातून त्यांनी पदव्युत्तर अर्थात एम.एस. ही पदवी संपादन केली.

 

एम.एस. इतके वैद्यकीय उच्चशिक्षण घेणारे डॉ. सुशय सुराणा हा बोदवड तालुक्यातील पहिले वैद्यकीय तज्ज्ञ ठरले आहेत. आगामी काळात ते सर्जरीमध्येच सुपर स्पेशालिटी  करणार आहेत. दरम्यान, या यशाबद्दल त्यांचे आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, रोहिणी खडसे, आबा पाटील यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरातील मान्यवरांनी कौतुक करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version