Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. सुनील पवार प्राचार्य गटातून सिनेट पदासाठी बिनविरोध निवड !

शहादा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे नुकतीच सिनेटपदासाठी निवडणूक घेण्यात आल्या त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादाचे प्राचार्य डॉ एस. पी. पवार यांची प्राचार्य गटातून इतर मागासवर्गीय संवर्गातून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्याकांन व मान्यता परिषद अर्थातच नॅक समितीने “ए” ग्रेड दिली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रात 3.15 सीजीपीए प्राप्त करून महाविद्यालयाने बहुमान प्राप्त केला आहे. प्राचार्य डॉ.एस.पी.पवार हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे फार्मासुटीकल सायन्स या विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या औषधनिर्माणशास्त्रच्या संशोधन आणि मान्यता विभागाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमनपद त्यांनी भूषविले आहे.

डॉ.एस.पी.पवार यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे हर्बल टेक्नॉलॉजी विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त शोध निबंध तसेच संशोधन यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असून त्यांनी अनेक परिसंवाद, कार्यशाळा आणि परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांना वीस वर्षापेक्षा जास्त औषधनिर्माणशास्त्रच्या (फार्मसी) च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचा अनुभव असून डॉ. पवार यांना अनेक महाविद्यालयात आमंत्रित शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी आमंत्रित केले जाते.

आतापर्यंत एकूण 9 पी.एच.डी. (पदव्युत्तरपदवी) च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून कार्य केले असून त्यांना संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे त्यापैकी 5 विद्यार्थ्यांचे पी.एच.डी. पूर्ण झाले असून 6 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच पदव्युत्तर (एम.फार्मसी)च्या अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी (रिसर्च प्रोजेक्ट) मार्गदर्शन केले आहे व 10 पेक्षा जास्त पुस्तकांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, निवृत्त पर्यवेक्षक पी. यु. पवार सर तसेच महाविद्यालयातील यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version