Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना वा.रा सोनार स्मृती पुरस्कार प्रदान

अमळनेर प्रतिनिधी । धरणगाव येथील विख्यात साहित्यीक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना तात्यासो. वा.रा. सोनार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित साहित्यिक तात्यासो वा.रा सोनार स्मृती पुरस्कार साहित्यिक डॉ संजीव कुमार सोनवणे यांना मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ प्रा. डॉ विश्‍वासराव पाटील यांच्याहस्ते जुना टाऊन हाँल अमळनेर येथे प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ कृष्णा पोतदार होते. तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती डॉ संजीव कुमार सोनवणे प्रा. डॉ. विश्‍वासराव पाटील ,जगदीश देवपूरकर, कवी रमेश पवार ,चेतन सोनार, नरेंद्र निकुंभ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक रमेश पवार यांनी केला. पाहुण्यांचा परिचय दिनेश नाईक यांनी करून दिला.
यावेळी जगदीश देवपूरकर ,डाँ विश्‍वास पाटील यांनी वा.रा सोनार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य माणूस असामान्य कसा बनतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वा.र.सोनार होय. आज त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जात आहे आणि तोही एका एका साहित्यक्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्रातील योग्य व्यक्तीला दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढलेली आहे.असे सांगितले. साहित्यामुळे माणूस बदलतो ,साहित्य क्षेत्रात अशी माणसे दुर्मिळ असतात अशा व्यक्तीचा सन्मान हा आनंदाचा क्षण आहे. पुरस्कार्थी डॉ संजय सोनवणे यांचा शाळेतील मी मुख्याध्यापक जरी असेल पण ते शाळा बाहेरील माझ्या साहित्य क्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्रातील जीवनातील ते माझे मार्गदर्शक आहेत असे व्यंगचित्रकार ज्येष्ठ पत्रकार प्रा. बी.एन. चौधरी यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देताना डाँ संजीव कुमार सोनवणे खानदेशातील ज्येष्ठ साहित्यिक कवी नाट्यकर्मी व चेतन श्री प्रकाशनाचे संस्थापक स्वर्गवासी वा.रा सोनार यांच्या स्मृतीनिमित्त म. सा. प शाखा अमळनेर च्या वतीने हा जो पुरस्कार मला दिला यामुळे मला भविष्यात काम करण्याची प्रेरणा तर मिळेलच पण हा पुरस्कार माझ्या घरातला पुरस्कार आहे. चेतश्री प्रकाशने आतापर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.. त्यामुळे नवेदीत कवीनां प्रेरणादायी आहेत.हा पुरस्कार म्हणजे तात्यांनी दिलेली ऊर्जा आहे, हा पुरस्कार म्हणजे साहित्य क्षेत्रातला ज्ञानपीठ पुरस्कार इतकाच महत्त्वाचा आहे असे सांगितले.
सूत्रसंचालन सौ विजया गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रमेश माने यांनी केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. बी. एन चौधरी, शरद कुमार बन्सी, डी. एस. पाटील, एस पी .सोनार धरणगाव ,विलास पाटील चोपडा ,भाऊसाहेब देशमुख ,गोकुळ बागुल ,दिलीप सोनवणे ,डाँ माधुरी भांडारकर, संजय सूर्यवंशी गं का.सोनवणे, शरद सोनवणे, भागवत गुरुजी, सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील, बाळकृष्ण बागुल, पि.के.पाटील व वाचन प्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version