Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.सध्या सोनवणे यांना अमेरिकेतील मानद डि.लीट पदवी बहाल

यावल प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांना नुकतीच अमेरिकेतील विद्यापीठामार्फत मानद डि.लीट पदवी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव द्वारा संचालित यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांना नुकतीच अमेरिकेतील विद्यापीठामार्फत मानद डिलीट पदवी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल हा गौरव यूनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाद्वारा करण्यात आला. यापूर्वी देखील विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार व सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे, अध्यक्ष गोकुळ पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, संचालक महेंद्र भोईटे, भाऊसाहेब प्रमोद काळे, विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार , उपप्राचार्य प्रा .ए.पी.पाटील, संजय पाटील, प्रा.एस.आर. गायकवाड, डॉ.सुधा खराटे, डॉ.एस.पी.कापडे, मनोज पाटील, मिलिंद बोरघडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version