Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. पाकिजा पटेल यांना आंध्रप्रदेशकडून राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार

पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथील मुख्याध्यापिका डॉ. पाकीजा उस्मान पटेल यांना मानिकी रेड्डी हेल्थ केअर सेंटर काकिनाडा आंध्र प्रदेश या संस्थेकडून राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                          

डॉ. पटेल या उपक्रमशील शिक्षिका असून नाविन्यपूर्ण उपक्रम सतत राबवित असतात. त्यांचे शैक्षणिक , सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याने राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला. न्याय, बंधुता ,स्वातंत्र्य समता या संविधानिक मूल्याची त्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करीत असतात. विद्यार्थी हा देशाचा सुजान व सुसंस्कृत नागरिक घडावा यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. आतापर्यंत डॉ.पाकिजा पटेल यांना 82 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकतीच त्यांना युरोप कडून डॉक्टरेट उपाधी मिळाली आहे.        

या राष्ट्रीय पुरस्काराने पुन्हा एकदा राजवड गावाचे नाव प्रकाशझोतात आले आहे. या यशाबद्दल संतोष पाटील पहुर, बाळासाहेब कदम, श्यामकांत वर्डीकर, कैलास पवार, निलेश पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील,  जयप्रकाश सूर्यवंशी, प्रवीण कोळी यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version