डॉ. कुंदन फेगडे यांनी प्रसिध्द केला ‘विकासाचा वचननामा’ !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्य पार्श्वभूमिवर डॉ. कुंदन फेगडे यांनी ‘विकासाचा वचननामा’ जाहीर केला असून या माध्यमातून मतदारसंघाचा समग्र विकास करण्याची ग्वाही दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून आश्रय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे यांनी दावा सादर केला असून यासाठी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबवतांनाच विविध जनकल्याणकारी उपक्रम देखील राबविले आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर मतदारसंघासाठी आपल्या विकासाचे ‘व्हिजन’ मांडले आहे.

या वचननाम्यात मतदारसंघासाठी समग्र विकासाचा आराखडा प्रस्तुत करण्यात आला आहे. यामध्ये पायाभूत सुविधांपासून ते शेती, जलसिंचन, शिक्षण, आरोग्य, ग्राम व शहरी विकास, सामाजिक न्याय, मागास समूहांचे उत्थान, आदिवासींसाठी विकासाच्या संधी, महिला सक्षमीकरण व बाल संस्कार यांच्यासह रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. मतदारसंघात कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगांचाही यात अंतर्भाव करण्यात आला आहे. मतदारसंघाचा समग्र विकास करण्याची ग्वाही या वचननाम्यात देण्यात आलेली आहे. मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा वचननामा पोहचविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कुंदन फेगडे यांनी दिली आहे.

Protected Content