Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. केतकीताई पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या कन्या डॉ. केतकीताई पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी कधीपासूनच सुरू केली आहे. त्यांनी आधी कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता जनसंपर्क मोहिम सुरू केली. यानंतर, मात्र त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. स्वत: एकनाथ खडसे यांनी अलीकडेच डॉ. केतकी पाटील या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असे भाकीत केले होते.

या अनुषंगाने डॉ. केतकीताई पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. पक्षाकडून रावेरमधून लढण्यासाठी आधी प्रवेश करून मग दावा करता येईल या हेतूने त्या भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे समजते. अर्थात, यातून त्या रावेरच्या जागेसाठी दावा पक्का करणार आहेत. साधारणपणे श्रीराम मंदिराच्या उदघाटनाच्या नंतर त्यांचा प्रवेश होऊ शकतो.

Exit mobile version