Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनादेश अनादरप्रकरणी डॉ. शीतल ओसवाल यांना एका वर्षाचा तुरूंगवास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील येथील गणपती हॉस्पीटलचे संचालक डॉ.शीतल स्वरुपचंद ओसवाल यांना धनादेश अनादरप्रकरणी दाखल तीन खटल्यांमध्ये ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा न्यायमुर्ती जान्हवी केळवर यांनी सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.ओसवाल यांनी अनील तोताराम शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून गणपती हॉस्पीटलमध्ये लॅब टेक्निशयन म्हणून सेवा देत होते. वर्षानुवर्ष दिलेल्या सेवेपोटी या दाम्पत्याला वेतनापोटी डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश दिले होते. सोबतच धनादेश दिल्याबाबत एक पत्रही दिले होते. त्यातील १० लाखांचा एक धनादेश वटला होता. अन्य १० लाखांचे दोन व ५ लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. त्यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि धनादेश अनादरप्रकरणी पुरावे सादर केले. त्यानुसार गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता प्रथम वर्ग न्यायमुर्ती जान्हवी केळकर यांच्यासमोर तीनही खटले चालले. त्यात डॉ.ओसवाल दोषी ठरल्याने तीनही खटल्यात त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिरसाळे यांच्यावतीने ॲड.आर.आर.गिरनारे व ॲड. हेमंत गिरनारे यांनी काम पाहिले.

Exit mobile version