Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. हर्षल महाजन एम.डी. परिक्षेत उत्तीर्ण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टाकरखेडा येथील मूळ रहिवासी असणारे डॉ हर्षल महाजन यांनी आरोग्य व विज्ञान विद्यापीठच्या   एम.डी .मेडीसनच्या अंतिम परिक्षेत यश संपादन केले आहे.

 

डॉ. हर्षल महाजन यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य व विज्ञान विद्यापीठ द्वारे घेण्यात आलेल्या एम. डी .( मेडिसीन ) च्या अंतीम परिक्षेत शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मिरज येथुन यश मिळविले आहे.

 

डॉ. हर्षल महाजन हा महाराष्ट्र शासनाच्या भुजल सर्वेक्षण आणी विकास यंत्रणा ,जळगांव कार्यालयातील तात्रिक अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले समाधान नारायण महाजन यांचा सुपुत्र आहे. टाकरखेडा अशा छोटयाशा गावातुन आपले शिक्षण पुर्ण करून मिळवलेल्या या यशामुळे डॉ.हर्षल महाजन याचे टाकरखेडा ग्रामस्थांनी हर्षल महाजन याने मिळवलेल्या यशाचे स्वागत केले आहे.

Exit mobile version