Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबीर

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे दि. ६ ते ९ ऑक्टोंबर मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे गरजु रूग्णांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर दि. ६ ते ९ ऑक्टोंबर चार दिवस मोफत तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जनरल मेडीसीन महाआरोग्य शिबीरही घेतले जाणार आहे. महाशिबीरात मुतखडा, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहे. तसेच जनरल मेडीसीन महाआरोग्य शिबीरात किडनीचे आजार, ब्रेन हॅमरेज, मेंदूज्वर, फुफ्फुसाचे आजार, न्युमोनिया, दमा, क्षयरोग, विषबाधा, लिव्हर, मलेरीया, मोफत डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मेडीसीन शिबीरात ब्रेम हॅमरेजशी संबंधीत उपचारासाठी रूग्णालयात भरती झालेल्या रूग्णांची एमआरआय तपासणी सवलतीत केली जाणार आहे. या महाशिबीरात एमसीएच तज्ञ डॉक्टरांकडुन रूग्णांची तपासणी देखिल मोफत केली जात आहे.

हे शिबीर दि.६ ते ९ आक्टोंबर पर्यंतच राहणार आहे.शिबिरातील गरजूच्या शस्त्रक्रिया या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत होणार असून सोबत रेशनकार्ड व आधारकार्ड आणावे. महाशिबीरासाठी विभागनिहाय स्वतंत्र टिम कार्यरत करण्यात आल्या आहेत. रूग्णांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली असुन त्यामुळे शिबीराचा लाभ घेण्यासाठी गरजु रूग्णांनी त्वरीत आशिष भिरूड ९३७३३५०००९ आणि रत्नशेखर जैन ७०३०५७११११ या क्रमांकावर संपर्क साधुन आजच नाव नोंदणी करून घ्यावी असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version