Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.चारूदत्त साने पुण्यस्मरणार्थ शेंदुर्णी येथे मोफत आरोग्य शिबिर

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ. चारूदत्त साने यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य मोफत रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले.

साने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि गोदावरी वैद्यकिय व सामाजिक प्रतिष्ठाण औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली . त्यांत डॉ. विकास रत्नपारखी ( हदयरोग तज्ञ ), डॉ कल्पक साने ( मधूमेह तज्ञ), डॉ. प्रशांत पाटील ( अस्थिरोग तज्ञ ), डॉ. राजश्री रत्नपारखी ( बालरोग तज्ञ ), डॉ .अपूर्वा चित्ते ( त्वचारोग तज्ञ ), डॉ समिर सोनार (सोनोग्राफी तज्ञ ), डॉ. सागर पोतदार (नेत्ररोग तज्ञ ) तसेच डॉ. नजिमा पटेल, डॉ इम्रान पटेल, डॉ. योगेश भोगावकर यांचा समावेश होता . यावेळी ५४3 रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधी देण्यात आली . तसेच ३० ECHO (इको ) तपासणी व २०० ECG तपासणी मोफत करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. विकास रत्नपारखी (हदयरोग तज्ञ ) हे होते . मान्यवरांच्या हस्ते डॉ. चारूदत्त साने व डॉ. वसंतदादा साने यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्ज्वलन करण्यात आले . यावेळी भाजपा जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले व शिबिर उपक्रमाचा गौरव केला.

यावेळी भाजप नेते उत्तम थोरात, अमृत खलसे, हभप. कडोबा माळी, इंग्लिश मेडीयम प्राचार्या रुचाताई साने, नारायण गुजर , देवचंद बारी , श्रीकृष्ण चौधरी, डॉ.पंकज सूर्यवंशी, राजेंद्र भारुडे, डॉ. अजय सूर्वे, डॉ. देवानंद कुळकर्णी, डॉ. अल्केश नवाल, कडोबा सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक, आदी मान्यवर उपस्थित होते .प्रास्ताविक डॉ. कल्पक साने यांनी केले अध्यक्षीय भाषण डॉ. विकास रत्नपारखी यांनी केले. मनोगतात, साने परीवाराचे सामाजिक व वैद्यकिय क्षेत्रात योगदान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. आभार संस्थाध्यक्षा डॉ. कौमुदी साने यांनी मानले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. यावेळी शेंदुर्णी डॉक्टर असोशिएशन, साने हॉस्पिटल कर्मचारी, सरस्वती, श्रीकृष्ण विद्यालय स्टॉफ यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version