Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एस. टी. कष्टकरी जनसंघाच्या विभागीय अध्यक्षपदी डॉ. अश्‍वीन सोनवणे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे यांनी एस. टी. कष्टकरी जनसंघाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ विधीज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्थापन केलेल्या एस. टी. कष्टकरी जनसंघाच्या विभागीय अध्यक्षपदी जळगावचे माजी उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांमधून अलीकडेच झालेल्या विभागीय निवडणुकीत सर्वच्या सर्व १७ उमेदवार निवडून आले होते. या यशाची पावती म्हणून त्यांच्यावर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुंबई येथे शनिवारी ऍड. गुणरत्न सदावर्ते आणि ऍड. जयश्री पाटील यांच्या हस्ते डॉ. अश्‍वीन सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना अधिकृतपणे एस.टी. कष्टकरी जनसंघाच्या विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली. एस.टी. कर्मचार्‍यांच्या सर्व समस्यांचे निराकरण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल असा मानस डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्यावरच आता नागपूर विभागाच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी देखील सोपविण्यात आलेली आहे.

Exit mobile version