Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सिंधी कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, जळगाव येथे वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

सन 2022 -23 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. 15 जुलै 2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी शनिवार, दि. 30 जुलै 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका / आणि पदवी नंतरच्या पव्युत्तर विद्यार्थ्यांनी बुधवार, दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यावसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया शुक्रवार, दि. 30 सप्टेबर,  2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासर्वीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगावचे गृहपाल यांनी केले आहे.

वसतीगहामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी पासून ते पुढील अभ्यासक्रमाकरीता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.  शालेय विद्यार्थी इयत्ता 10 व 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची  प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता  इतर सोयी सुविधा शासना मार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.

ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जळगावचे गृहपाल सुर्यभान पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version